सर्वांना नमस्कार व सुप्रभात....
सिल्लोड गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्यात येत आहे.
शिक्षक पतसंस्थेच्या इमारती शिवाय सिल्लोड तालुक्यातील आपले सर्वांचे हक्काचे ठिकाण म्हणजे गटसाधन केंद्र....
या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने येथे येऊन आपले काम सहज व चटकन झाल्याचे समाधान व आपल्या शाळांमध्ये काम करण्याची प्रेरणा व उत्साह घेऊन जावे या ध्येयाने गटसाधन केंद्रातील सर्व टीम काम करत आहे. एक सुसज्ज प्रशिक्षण / बैठक कक्ष म्हणजेच तालुक्यातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांचेसाठी कक्ष अद्ययावत संगणक प्रोजेक्टर माॅनिटर स्पिकर माइक सिस्टीम या सुविधा तेथे असाव्यात. अशी इच्छा आपणापैकी अनेक शिक्षकांनी व्यक्त केली आहे. आणि जे जे शक्य होईल ते ते करण्यासाठी गटसाधन केंद्राची टीम कटीबद्ध आहे. काल पर्यंत आमच्या टीम मधील सर्व विषय साधनव्यक्ती उंडणगाव केंद्रप्रमुख सोनवणे सर, गव्हाणे सर, तडवी सर , के-हाळा मुख्याध्यापक मोरे सर, किशोर जगताप सर बागुल सर, वाडेकर सर, जे.के. देशमुख सर, व इतर काही सन्माननीय बंधूनी या कामासाठी आपले योगदान म्हणून एक एक फुलांची पाकळी अर्पण केली आहे. हे कुणा एकाचे काम नाही... हा जगन्नाथाचा रथ आहे सर्वांना मिळून ओढायचा आहे....
कृपया सर्वांना विनम्र आवाहन करण्यात येते की सर्व केंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक प्रशाला मुख्याध्यापक पतसंस्था संचालक विविध शिक्षक संघटना पदाधिकारी संस्थाचालक व मुख्याध्यापक बंधूंनी यासाठी यथाशक्ती यथामति योगदान करावे....
आपलाच
दिलीप 🙏🙏
Friday, 9 November 2018
समुह साधन केंद्र आमठाणा या कार्यलयाचे सुशोभिकरण व रंगरंगोटी अहवान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment