*प्रति*
*केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक सर्व*
*ता. सिल्लोड.*
*विषय :- दुष्काळग्रस्त/ टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टीच्या कालावधीत पूरक पोषण आहार देणे बाबत.*
संदर्भ;-1)मा. संचालक याचे आदेश
2)मा.शिक्षणाधिकारी(प्रा.)जिल्हा परिषद औरंगाबाद
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध/अंडी/फळे/पौष्टिक आहार देण्याचा निर्णय संदर्भीय पत्रान्वये घेण्यात आलेला आहे.
तरी दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना 3 दिवस पूरक आहार देण्याची सोबत दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी, सदर कामात हयगय किंवा दिरंगाई केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील.
सोबत:१)वेळा पत्रक व पत्र
२)परिशिष्ट-ब आणि परिशिष्ट-क
*गटशिक्षणाधिकारी*
*शालेय पोषण आहार*
*पं स सिल्लोड*