दिनांक : 7/10/2018
प्रति ,
मुख्याध्यापक
व सर्व शिक्षक
केंद्र
आमठाणाव अंधारी ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : दररोज एका शास्रीज्ञ चरित्र शृंखला उपक्रम परिपाठात प्रभावीपणे राबविणे बाबत-
उपरोक्त
विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि , मी मागील आठवड्यात केंद्रातील बहुतेक शाळेस
भेटी दिल्या असता त्या शाळेत खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आलेल्या आहेत.
त्या दूर करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे शिक्षण सल्लगार समितीच्या बैठकीत
मंजूर करण्यात आलेले आहे , आपल्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आपल्या केंद्रात
राबविण्यात येणा-या विविध उपक्रम पैकी एक उपक्रम या नवीन वर्षासाठी दररोज राबविण्यात येणार आहे. दररोज एका शास्रीज्ञ चरित्र शृंखला उपक्रम परिपाठात .राबविण्यासाठी प्रभावीपणे अमलबजावणी करावी. वर्गाचे
वार्षिक नियोजन/घटक नियोजन/वेळाप़त्रक /उपक्रम यादी /साधन निवड रजिस्टर/पालक भेट
रजिस्टर/पालक भ्रमणध्वनी रजिस्टर तयार करून वर्गात लावुन वर्गसजावट करणे, नियीमत गणित पेटीतील साहित्याचा वापर करणे शाळेत वेळेवर जाणे, आपल्या वर्गातील मुलाना शालेय पोषण आहार देताना आपण स्वत उभे राहणे
दर शनिवारी पुरक आहाराचा लाभ देणे ,शाळेत पुर्ण वेळ हजर राहणे, मुलांना
स्वछतागृहाचा वापर करण्याची सवय लावणे, कोणत्याही प्रकारची शिक्षा न करणे,
आनंददायी अघ्यापन करणे, नेहमी हसतमुख राहणे, अप्रगत मुलासाठी जादा तास घेणे व एकही मुलगा अप्रगत राहणार नाही या साठी आपण
मनापासुन कार्य करावे. व आपल्या शाळेचा
नाव लौकीक वाढवावा
केंद्रप्रमुख श्री. व्ही जी कुंभारे,
No comments:
Post a Comment