Thursday, 25 January 2018

शाळेत गैरहजर असल्याचा खुलासा सादर करणे बाबत -

                                            जा क्र/के प्रा शा आमठाणा
                                         दिनांक : 0 9/12/2017
प्रति ,
     मुख्याध्यापक { जि प प्रा शा  सिद्धेश्वर वाडी }
      ता सिल्लोड जि.औरंगाबाद .
विषय : श्री घोटकर बी के  शाळेत गैरहजर असल्याचा खुलासा सादर  करणे बाबत -
संदर्भ :-श्री जे व्ही कदम याचा अहवाल  दि 9/11/2017
            उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि , दिनाक 9/12 /2017 रोजी प स सदस्या सौ कल्पना संजय जामकर यांनी शाळेस भेट दिली असता आपल्या शाळेत खालीलप्रमाणे अनियमितता आढळून आलेल्या आहेत त्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतूदीचा भंग होत असल्याचे प्रथम दर्शनी निर्द्शनास येत आहे
1 –श्री घोटकर बी के हे हालचाल नोद न करता  शाळेतून घरी गेलेले दिसून आले
२-शालेय पोषण आहार मेनुप्रमाणे देण्यात येत नाही पूरक आहार दिला जात नाही तांदूळ व धान्यादि साठा शाळेत न ठेवता घरी ठेवण्यात येतो शालेय पोषण अभिलेखे पूर्ण नाही
३-शाळेची रंग-रंगोटी करण्यात आलेली नाही 4-मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
5-शाळा डिजिटल करण्यात आलेली नसून स्मार्ट टी व्ही /प्रोजेक्टर  या पैकी कोणतेही साधन नाही
6- शाळा स्तरावर वेळोवेळी आलेला निधी खर्च करण्यात आलेला नाही त्यामुळे विधार्थी वचित राहिले गणवेश दिसून आले नाही  तकार पेटी बसविली नाही
अशा गंभीर स्वरूपाच्या तकारी त्यांनी केलेल्या आहेत तरी आपण अनु 1 ते 6 बाबीचा खुलासा तीन दिवसात सबळ पुरव्यासह माझ्या समक्ष सादर करावा खुलासा विहित मुदतीत सादर न केल्यास बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतूदी नुसार कारवाही वरिष्ठ कार्यलयास प्रस्तवित  करण्यात येईल याची नोद घ्यावी

No comments:

Post a Comment